प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाची लाट (the corona wave) थोपवून लावण्यात यशस्वी ठरलेल्या नागपूर शहर (Nagpur city) व जिल्ह्यातील निर्बंधात आणखी सूट देण्यात आली आहे. आतापर्यंत सायंकाळी 5 पर्यंत सुरू असणाऱ्या दुकानांना वाढीव 3 तास देत रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  नागपूर (Nagpur).  कोरोनाची लाट (the corona wave) थोपवून लावण्यात यशस्वी ठरलेल्या नागपूर शहर (Nagpur city) व जिल्ह्यातील निर्बंधात आणखी सूट देण्यात आली आहे. आतापर्यंत सायंकाळी 5 पर्यंत सुरू असणाऱ्या दुकानांना वाढीव 3 तास देत रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवार, 21 जूनपासून नवा आदेश लागू होईल्. यात अत्यावश्यक व इतर दुकानांचाही समावेश असल्याने पालकमंत्री नितीन राऊत (Guardian Minister Nitin Raut) यांच्या निर्देशानंतर शुक्रवारला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे (District Collector Ravindra Thackeray) यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

  ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोरोनाचा पाॅझिटिव्हीटी दर व रिक्त आॅक्सिजन खाटांच्या संख्येला मानक ठरवून लेवल ठरविण्यात आली. यात नागपूर शहर व जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर 5 टक्केपेक्षा कमी आणि रुग्णालयातील आॅक्सिजनच्या खाटा 25 टक्केपेक्षा कमी असल्याने लेवल 1 मध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. यानुसार बहुतांश आस्थापना व प्रतिष्ठाने नियमित करण्याची परवानगी आहे. परंतु, एकाचवेळी संपूर्ण शहर मोकळे करण्याची घाई प्रशासनाने न घेता काही निर्बंध कायम ठेवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी थोडा वेळ घेतला होता. आता यात आणखी सुधार झाल्यानेच प्रशासनाने रात्री 8 वाजेपर्यंत मोकळीक देण्याचा निर्णय घेतला आहे.

  धार्मिक आणि शैक्षणिक स्थळे
  नव्या निर्देशानुसार सर्व शाळा, काॅलेज, कोचिंग क्लासेस आणि इतर शैक्षणिक संस्था बंद राहतील. यातील कोचिंग क्लासेसना यापूर्वीच वेळेची व क्षमतेची मर्यादा असेल. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशासकीय कामकाज, परीक्षा, आॅनलाइन क्लासेस, प्रॅक्टिकल परीक्षेचे कामकाज करता येईल. मात्र, धार्मिक स्थळे पूर्णतः बंद असतील.

  माॅल आणि अॅम्युझमेंट पार्कलाही सूट
  नव्या आदेशात माॅल्स, मल्टिफ्लेक्सलाही रात्री 8 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. मात्र, येथील पाणीसंबंधित मनोरंजनाच्या खेळांवर बंदी असेल. रेस्टाॅरेंटही आता रात्री 11 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. यापूर्वी रात्री 10 वाजेपर्यंत ही सूट होती. माॅल्समधील रेस्टाॅरेंटलाही नव्या आदेशात सूट दिली गेली. याशिवाय मोकळे मैदान, सार्वजनिक स्थळे, सायकलिंग सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत सूट देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील.

  अशी असेल सूट:
  लोकल ट्रेन:       नियमित
  क्रीडा:                अनियमित
  सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम:      50 टक्के क्षमता आणि 100 पेक्षा जास्त नको
  विवाह समारोह:      50 टक्के क्षमता आणि 100 पेक्षा जास्त नको
  अंत्यसंस्कार:     केवळ 50 जणांना उपस्थितीची परवानगी
  आमसभा, बैठक:     केवळ आॅनलाइन पद्धतीने परवानगी
  बांधकाम:    नियमित सुरू
  कृषी संबंधित दुकाने:    रात्री 8 वाजेपर्यंत
  ई-काॅमर्स आणि इतर सेवा:    नियमित
  जिम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा:    रात्री 8 वाजेपर्यंत
  सार्वजनिक वाहतूक:     100 टक्के
  कार्गो व्यवहार:    नियमित
  उत्पादन प्रतिष्ठाने:    नियमित
  आंतरजिल्हा परिवहन, खासगी:  केवळ रेड झोनमधून येणाऱ्याना ई-पास बंधनकारक