मुख्यमंत्र्यांवरील भूखंड घोटाळा दाबण्यासाठी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात आरोप, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला प्रत्युत्तर

राहुल शेवाळे यांनी जे आरोप केलेत, त्या घाणीत आपल्याला जायचं नाही असंही आदित्य म्हणालेत. गद्दारी करणाऱ्यांकंडून दुसरं काही अपेक्षित नाही, अशी टीकाही त्यांनी राहुल शेवाळे आणि शिंदे गटावर केली आहे. मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप असताना, त्यांनी राजीनामा देण्याची मागणी होते आहे, अशा स्थितीत लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी असे आरोप करण्यात येत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.

  नागपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला आहे, त्यांना वाचवण्यासाठी आणि राज्यपालांना वाचवण्यासाठी आपल्यावर सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात आरोप करण्यात आल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. राहुल शेवाळे यांनी जे आरोप केलेत, त्या घाणीत आपल्याला जायचं नाही असंही आदित्य म्हणालेत. गद्दारी करणाऱ्यांकंडून दुसरं काही अपेक्षित नाही, अशी टीकाही त्यांनी राहुल शेवाळे आणि शिंदे गटावर केली आहे. मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप असताना, त्यांनी राजीनामा देण्याची मागणी होते आहे, अशा स्थितीत लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी असे आरोप करण्यात येत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. चांगला फूटबॉल खेळणाऱ्या मेसीभोवती जसे अनेकजण असतात, तसेच आपल्यावर आरोप होतायेत. आपण खेळंत राहायचं असंही ते म्हणाले.

  शेवाळेंचं लग्न कसं वाचवलं, हे आम्हाला माहीत
  राहुल शेवाळेंना काडीमात्र किंमत देत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. राहुल शेवाळेंचं लग्न आमच्या घरातल्यांनी कसं वाचवलं हे आम्हाला माहीत आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत. राहुल शेवाळे हे काळ्या मनाचे आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ आले आहेत. ते सगळअयांना माहित आहे. आपल्याला त्यांच्यावर काहीही बोलायचं नाही, असं ते म्हणाले.

  खोके सरकार राज्यपालांना वाचवतंय
  प्रकल्प राज्याबाहेर गेले, त्याबाबात घटनाबाह्य मुख्यमंत्री मौन बाळगून आहेत. राज्यपालांना माफी मागण्यासाठी अजून या सरकारनं काहीही केलेलं नाही. खोके सरकार राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मुद्द्यांवर न बोलता मूळ प्रश्नांवर न बोलता असे घाणेरडे आरोप करण्यात येत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणालेत. अधिवेशनात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.

  हे सरकार महाराष्ट्रद्वेषी
  महाराष्ट्र-कर्नाटक वाद हा कर्नाटक निवडणुकासाठी पेटवण्यात येत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत बैठक होऊनही कर्नाटकचे मुख्यमंत्री वाद वाढवतायेत. मात्र त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही बोलत नाहीये. घाबरुन सरकार काहीही बोलत नाहीये, असा आरोपही त्यांनी केलाय. हे सरकार महाराष्ट्रद्वेषी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.