महिला होमगार्डचा विनयभंगाचा आरोप; पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

नागपूरमध्ये पोलीस निरीक्षकावरच (police inspector) विनयभंगाचा गुन्हा (molestation) दाखल करण्यात आला आहे. महिला होमगार्डचा (homeguard) विनयभंग केल्याचा आरोप आहे. नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम (Ashok Meshram) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नागपूर (Nagpur). नागपूरमध्ये पोलीस निरीक्षकावरच (police inspector) विनयभंगाचा गुन्हा (molestation) दाखल करण्यात आला आहे. महिला होमगार्डचा (homeguard) विनयभंग केल्याचा आरोप आहे. नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम (Ashok Meshram) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

    नेमकं काय घडलं?
    पोलीस निरीक्षकावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे. पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यावर ते कार्यरत असलेल्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. होमगार्ड महिलेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मेश्रामांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

    मुंबईतही महिला पोलिसाचा अधिकाऱ्यावर आरोप
    दुसरीकडे, लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.