अनिल देशमुखांना समर्थन देण्यासाठी नागपुरात चक्क टरबूज फोडून आंदोलन

परमबीर सिंग आणि भाजप यांचं साटलोटं असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. गृहमंत्री देशमुख नागपूरचे असून राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी ताकद उभी केली आहे. यावेळी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून टरबूज अर्थात कलिंगड फोडून भाजप आणि परमबीर सिंग यांचा निषेध केला आहे.

    नागपूर : परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकच खळबळ माजली आहे. अनिल देशमुख यांनी नसुली करण्याचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागात विरोधकांकडून आंदोलन होत असताना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांना समर्थन देण्यासाठी नागपूरात चक्क टरबूज फोडून आंदोलन केलं आहे.

    परमबीर सिंग आणि भाजप यांचं साटलोटं असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. गृहमंत्री देशमुख नागपूरचे असून राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी ताकद उभी केली आहे. यावेळी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून टरबूज अर्थात कलिंगड फोडून भाजप आणि परमबीर सिंग यांचा निषेध केला आहे. यावेळी भाजपविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

    भाजपाचेही विविध ठिकाणी आंदोलन

    माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजपच्या वतीने राज्यात विविध भागात आंदोलन होत आहेत. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. बारामतीत देशमुख यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. पुण्यात देखील आंदोलन करण्यात आलं आहे.