अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा, अन्यथा भाजपाचे आंदोलन थांबणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा ईशारा

अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाचं पाहीजे. त्याशिवाय भाजपचे आंदोलन थांबणार नाही. फक्त विरोधक बोलले की, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू. आता अशा वाक्यांची आम्हाला सवय झाली. त्याने फार काही फरक पडत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    नागपूर : पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचं राजकारण गल्ली ते दिल्ली ढवळून निघालं आहे. भाजपने आक्रमक पावित्रा घेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. विरोधकांकडूv सरकारवर जोरदार टीका होत आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाकडून होत आहे. याचं प्रकरणावरुन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते यांनी सरकारवर टीका केली आहे.

    फडणवीस म्हणाले की, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्र लिहून गृहमंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र अशा प्रकारचे हे पहिलेचं पत्र नाही. यापूर्वी तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता.  तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलिस महासंचालकसारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे कारणचं हे होते, भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते. असा आरोप यावेळी फडवीसांनी केला.

    अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाचं पाहीजे. त्याशिवाय भाजपचे आंदोलन थांबणार नाही. फक्त विरोधक बोलले की, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू. आता अशा वाक्यांची आम्हाला सवय झाली. त्याने फार काही फरक पडत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरे अनिल परब देतात. असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे. असही त्यांनी म्हटलं.

    चौकशी नेमकी कोणाची ?

    फडणवीस म्हणाले की, सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते. हेही स्पष्ट झाले पाहिजे. NIA किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे. ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. ते केवळ परमबीर सिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा? थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्‍यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का? असा सवाल फडणवीस यांनी केला.