ओळखीचा फायदा घेत तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न

    नागपूर (Nagpur) : घरात घुसून २२वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना वाडी भागात शुक्रवारी सकाळी घडली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून जावेद अखिल शेख (वय २५) या युवकाला अटक केली.

    शुक्रवारी सकाळी तरुणी घरी एकटी होती. संधी साधून जावेद तिच्या घरात घुसला. तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड केली. जावेद पळाला. तरुणीने वाडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून जावेदला अटक केली.