आरोपी आलोकने मेव्हणीवर अत्याचार केल्याचा शवविच्छेदन अहवालाचा अंदाज; शस्त्राच्या धाकावर अत्याचार?

कुटुंबातील पाच जणांची हत्या (by killing) करुन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना (committing suicide) काल नागपुरात उघडकीस आली होती. या प्रकरणात आता नवनवीन बाबी समोर येत आहेत. आरोपीने हत्येच्या आधी मेव्हणीवर अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

  नागपूर (Nagpur). कुटुंबातील पाच जणांची हत्या (by killing) करुन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना (committing suicide) काल नागपुरात उघडकीस आली होती. या प्रकरणात आता नवनवीन बाबी समोर येत आहेत. आरोपीने हत्येच्या आधी मेव्हणीवर अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस तरुणीच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टची (post mortem report) वाट पाहत आहे.

  मेव्हणीला चाकूचा दाखवत अतिप्रसंग?
  नागपुरात राहणाऱ्या आलोक माटूरकर याने पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेव्हणी अशा पाच जणांची हत्या करुन आत्महत्या केली होती. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र काही तासातच या प्रकरणात नवीन बाबी पुढे येताना दिसत आहेत. आरोपी आलोक माटूरकरने हत्या करण्यापूर्वी मेव्हणीला चाकूचा दाखवत अतिप्रसंग केल्याचा संशय आहे. त्यानंतर त्याने तिचा गळा कापला असावा. भाऊजी घरात शिरताच काहीतरी करेल याचा अंदाज आल्याने मेहुणीने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरु केले होते. त्यात त्यांच्या संघर्षाचा आवाजही रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे.

  हत्येचा कट आधीपासूनच रचला
  इतकंच नाही तर आरोपीने हत्येचा प्लान आधीपासूनच आखला होता त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागवले होते. ते त्याच्या मुलीच्या नावाने आल्याचं पुढे आलं आहे. आरोपी हा महिलांना वश करण्याची विद्या घेत होता, असंही समोर येत आहे. मात्र त्याचा उपयोग त्याने यात केला की नाही याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी यातील अनेक घटनांना दुजोराही दिला मात्र तपास सुरू असल्याने त्यावर पोलीस विशेष बोलण्याचं टाळत आहेत.

  नागपूरला हादरवणाऱ्या या घटनेचा तपास पोलीस सगळ्याच बाजूने करत आहेत. यात नेमकं काय झालं आणि कोणती अशी कारणं होती की सर्वसाधारण व्यक्तीने आपल्या जवळच्या पाच जणांची मोठ्या निर्दयतेने हत्या केली, आणि आत्महत्याही केली, याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. शव विच्छेदन अहवाल पुढे आल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.