नागपूरात बावनकुळे विजयी; महाविकास आघाडीची मत फुटली, आघाडीचं भवीतव्य धोक्यात?

नागपुर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे ३६२ मतांनी विजयी झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी घोषित केले आहे. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्यच धोक्यात असल्याचं बोललं जात आहे.

  नागपुर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे ३६२ मतांनी विजयी झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी घोषित केले आहे.

  नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ होते. मात्र, काँग्रेसने यात चमत्कार घडवण्याचा दावा केला होता. त्यांचा दावा हवेत राहिला. काँग्रेस-महाविकास आघाडीची 16 मते फुटली. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले रविंद्र भोयर यांना एक मत मिळाले. मतदानाच्या काही तास आधीच काँग्रेसने रविंद्र भोयर यांचा पाठिंबा काढत देशमुख यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.

  काँग्रेसने ऐनवेळी निर्णय बदलला

  नागपूरमध्ये काँग्रेसनं ऐनवेळी उमेदवार बदलल्याचा मोठा फटका पक्षाला बसल्याचं आता बोललं जात आहे. आधी छोटू भोयर यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी पक्षानं उमेदवार बदलून छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना आपला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे भोयर यांना या निर्णयाविषयी कोणतीही कल्पना नसल्याचं नंतर समोर आलं.

  उमेदवारी देताना काँग्रेसमध्ये एकमत नव्हतं. सुरुवातीला राजेंद्र मुळक यांचं नाव समोर करण्यात आलं. परंतु, त्यानंतर संघाचा स्वयंसेवक आयात करण्यात आला. नाना पटोले यांनी छोटू भोयर यांना आयात केलं. पण, ऐन प्रचाराच्या वेळेत भोयर कमी पडले, असा आरोप सुनील केदार यांनी केला. त्यामुळं सुनील केदार यांनी पुढाकार घेऊन उमेदवार वेळेवर बदलला. अपक्ष मंगेश भोयर यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला. राष्ट्रवादीची सुरुवातीपासूनच नाराजी होती. आम्हाला उमेदवारी अर्ज करताना बोलावलं नाही, असं राष्ट्रवादीचे नेते म्हणाले होते. शिवसेनाही मनातून काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागं नव्हती. या साऱ्यांचा फटका महाविकास आघाडीला बसला.

  त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्यच धोक्यात असल्याचं बोललं जात आहे.