bawankule chotu bhoyar

एकीकडे भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांना उमेदवारी देत अर्ज भरण्याआधी शक्तीप्रदर्शन सुरु होतं. त्याचवेळी दुसरीकडे भाजपा नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर(Chhotu Bhoyar Joins Congress) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

    नागपूर : नागपुरात(Nagpur) विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी(Legislative Council Election) भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांना उमेदवारी देत अर्ज भरण्याआधी शक्तीप्रदर्शन सुरु होतं. त्याचवेळी दुसरीकडे भाजपा नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर(Chhotu Bhoyar Joins Congress) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.

    भाजपा नेते आणि आरएसएसचे स्वयंसेवक असलेले नगरसेवक छोटू भोयर यांनी सोमवारी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या शहर कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश झाला. छोटू भोयर मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात नामांकन अर्ज भरणार आहेत. छोटू भोयर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. भोयर यांचा काँग्रेस प्रवेश भाजपच्या पराभवाचे संकेत असल्याचं पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत.

    छोटू भोयर यांनी जितकी मते भाजपाकडे अधिक आहेत तेवढ्याच मतांनी त्यांचा उमेदवार पराभूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले की, निवडणूक लढवणार नाही असं बावनकुळे म्हणाले होते. पण ते कार्यकर्त्यांशी खोटे बोलत होते. त्यांनी तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न केले. ज्या कारणांसाठी त्यांना विधानसभेत तिकीट नाकारले ती कारणे संपली का हे भाजपाने जाहीर करावे, अशी मागणी छोटू भोयर यांनी यावेळी केली.