Both the drivers were killed on the spot in a tragic accident at Warora

वरोरा येथील रत्नमाला चौकात एक भीषण अपघात झालेला आहे. यात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झालेला आहे. ही घटना संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली असल्याने संपूर्ण वरोरा परिसरात खळबळ उडाली आहे.

    वरोरा : वरोरा येथील रत्नमाला चौकात एक भीषण अपघात झालेला आहे. यात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झालेला आहे. नागपूरहून चंद्रपूरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खाजगी बसने दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला रस्त्याचे दुभाजन तोडून धडक दिली. यात ट्रॅव्हल्स मधील १५-१६ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्समधील दोन प्रवाशांना ट्रॅव्हल्सचा काही भाग कापून बाहेर काढण्यात आले आहे. 
    जखमींना त्वरित वरोरा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शब्बीर खान असे मृत ट्रॅव्हल्स चालकाचे नाव असल्याचे कळले आहे. तो (जालनगर) चंद्रपूर येथील रहिवासी आहे. तसेच, या व्यतिरिक्त इतर कुणाच्या मृत्यूची बातमी मिळालेली नसून, प्रवासी गंभीररीत्या जखमी असल्याचे कळले आहे. ही घटना संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली असल्याने संपूर्ण वरोरा परिसरात खळबळ उडाली आहे.  या प्रकरणाचा सविस्तर तपास वरोरा येथील स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे.