Bullet train in Vidarbha! Will reach Nagpur from Mumbai in three to three and a half hours; The mega project will be announced soon

मुंबई ते औरंगाबाद बुलेट ट्रेन सुरू झाली तर दीड ते पावणे दोन तासांत मुंबईहून औरंगाबादला जाता येऊ शकते. तसेच, तीन ते साडेतीन तासांत आपण मुंबईहून नागपूरला जाऊ शकतो. मोदी सरकार महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. मुंबई- अहमदाबाद दरम्यान प्रस्तावित पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम संथ गतीने सुरू असले तरी सरकार दोन अन्य बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी देण्याची शक्यता आहे(Bullet train in Vidarbha! Will reach Nagpur from Mumbai in three to three and a half hours; The mega project will be announced soon).

  दिल्ली : मुंबई ते औरंगाबाद बुलेट ट्रेन सुरू झाली तर दीड ते पावणे दोन तासांत मुंबईहून औरंगाबादला जाता येऊ शकते. तसेच, तीन ते साडेतीन तासांत आपण मुंबईहून नागपूरला जाऊ शकतो. मोदी सरकार महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. मुंबई- अहमदाबाद दरम्यान प्रस्तावित पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम संथ गतीने सुरू असले तरी सरकार दोन अन्य बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी देण्याची शक्यता आहे(Bullet train in Vidarbha! Will reach Nagpur from Mumbai in three to three and a half hours; The mega project will be announced soon).

  सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्ली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसीदरम्यानही बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्याची अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे.

  तयारी अंतिम टप्प्यात

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर कॉरिडॉरसाठी सीडीआर अंतिम टप्प्यात असून पुढील आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यातच तो रेल्वेकडून सोपविला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, दिल्ली-वाराणसी बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी रेल्वेच्या डीपीआरला मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने (एनएचएसआरपीसीएल) नोव्हेंबर महिन्यातच अहवाल सोपविला होता.

  8 प्रकल्पांवर लक्ष्य केंद्रीत

  प्रारंभिक माहितीनुसार, दिल्ली-वाराणसी बुलेट ट्रेन प्रकल्पावर जवळपास 1.5 लाख कोटींचा खर्च येईल तर मुंबई- नागपूर कॉरिडॉरसाठी कमी खर्च येण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-वाराणसी, मुंबई-नागपूर शिवाय पाच अन्य बुलेट ट्रेन प्रकल्पांबाबत डीपीआरचे काम सुरू आहे. सर्व जुळून आले तर पुढील एक दोन वर्षांतच कमीत कमी आठ बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर काम सुरू होण्याची शक्यता आहे.