नरबळीसाठी चेन्नईतून बालकाचं अपहरण? नागपूर रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरुप सुटका

तामिळनाडू एक्स्प्रेसने (Tamil Nadu Express) दोन आरोपी चेन्नईतील एका बालकाचे अपहरण करुन जात असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे रेल्वे पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी ट्रेन नागपुरात येताच माहितीच्या आधारे त्या डब्याकडे कूच केली.

  नागपूर (Nagpur) : नागपूर रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे (A child abducted from Chennai) चेन्नईतून अपहरण (Kidnapping) करण्यात आलेल्या बालकाची नागपुरात सुटका करण्यात आली. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे पोलिसांच्या (Nagpur Railway Police) कामगिरीची स्तुती केली जात आहे.

  काय आहे प्रकरण?
  नागपूर रेल्वे पोलिसांच्या कंट्रोल रुमला (The control room of Nagpur Railway Police) चेन्नई पोलिसांचा फोन आला. तामिळनाडू एक्स्प्रेसने (Tamil Nadu Express) दोन आरोपी चेन्नईतील एका बालकाचे अपहरण करुन जात असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे रेल्वे पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी ट्रेन नागपुरात येताच माहितीच्या आधारे त्या डब्याकडे कूच केली.

  ट्रेनमध्ये दोघांसोबत बालक सापडले
  तपासणी सुरु केली असताना दोघा जणांसोबत एक बालक असल्याचं दिसून आलं. त्या दोघांची चौकशी केली असता त्यांच्या कडून समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती. अखेर पोलिसांनी आपला झटका दाखवतात त्यांनी त्या बालकाला घेऊन जात असल्याचं सांगितलं.

  आरोपींची कबुली
  मोनू गरीबदास केवट आणि शिब्बू गुड्डू केवट अशी या आरोपींची नावं आहेत. त्यांनी या प्रकरणाची कबुली देत सांगितलं की आम्ही कोणालाही न सांगता या मुलाला घेऊन निघालो. रेल्वे पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आणि मुलाला ताब्यात घेऊन शेल्टरमध्ये ठेवलं. नरबळीसाठी सदर बालकांचे अपहरण करण्यात आल्याचा संशय रेल्वे पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

  तामिळनाडू पोलीस ताब्यात घेणार
  या संदर्भातील माहिती तामिळनाडू पोलिसांना देण्यात आली असून त्यांचं पथक नागपुरात येणार आहे. रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका बालकाला अपहरणापासून वाचवण्यात आले.

  धक्कादायक ! आंघोळीचा व्हिडीओ शूट करत तरुणीचे अपहरण
  दरम्यान, तरुणी आंघोळ करत असतानाचा व्हिडीओ चित्रित करुन आधी तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली, त्यानंतर तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा तरुणीच्या नाते संबंधातील असल्याची माहिती समोर आली आहे.