नागपुरात कोरोनाचा उद्रेक; तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या दररोज उच्चांक गाठत असल्याने गंभीर स्थिती

कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या दररोज उच्चांक गाठताना दिसून येत आहे. सोमवारी ९७१ रुग्णांची नोंद झाली. यातील ७९२ रुग्ण शहरातील, ११७ रुग्ण ग्रामीण भागातील तर, ६२ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. चाचण्यांच्या तुलनेत सोमवारी पॉझिटिव्हीटीचा दर वाढून ९.९ टक्क्यांवर पोहचला आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,९८,५५९ झाली असून मृतांची संख्या १०,१२३ वर स्थिर आहे(Corona eruption in Nagpur; Severe condition as the number of patients in the third wave reaches a daily high).

    नागपूर : कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या दररोज उच्चांक गाठताना दिसून येत आहे. सोमवारी ९७१ रुग्णांची नोंद झाली. यातील ७९२ रुग्ण शहरातील, ११७ रुग्ण ग्रामीण भागातील तर, ६२ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. चाचण्यांच्या तुलनेत सोमवारी पॉझिटिव्हीटीचा दर वाढून ९.९ टक्क्यांवर पोहचला आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,९८,५५९ झाली असून मृतांची संख्या १०,१२३ वर स्थिर आहे(Corona eruption in Nagpur; Severe condition as the number of patients in the third wave reaches a daily high).

    कोरोनाच्या तिसऱ्या लोटला ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या लाटेची सर्वाेच्च स्थिती कधी असेल हे पाहावे लागणार आहे. ही स्थिती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहे.

    नागपूर जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी कमी ९,८५२ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या ८,७१७ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ९ टक्के तर, ग्रामीणमध्ये झालेल्या १,१३५ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के होते.

    हे सुद्धा वाचा
    • 2022