नागपुरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या एकवर; पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतीवर

जिल्हा प्रशासन (district administration) आणि आरोग्य विभागाच्या (the health department) अथक प्रयत्नांनंतर राज्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या (corona positive patients) आटोक्यात आली होती. मात्र, लाॅकडाउन (the lockdown) शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने वाढतीवर आहे.

    नागपूर (Nagpur).  जिल्हा प्रशासन (district administration) आणि आरोग्य विभागाच्या (the health department) अथक प्रयत्नांनंतर राज्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या (corona positive patients) आटोक्यात आली होती. मात्र, लाॅकडाउन (the lockdown) शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने वाढतीवर आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यात बुधवारी 46 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 25, ग्रामीण भागातील 20 आणि जिल्ह्याबाहेरील 01 रुग्ण आहे.

    आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या अवघी 01 इतकी होती. शहरात आज 9413 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. तर कोरोनातून बरे झालेल्या 97 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात एकूण कोरोना संक्रमित रुग्णसंख्या 4 लाख 76 हजार इतकी आहे. तर कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी 658 आहे.

    कोरोनामुळे आतापर्यंत 9022 रुग्णांचा मृत्यू झाला. नागरिकांच्या सुविधेकरिता प्रशासनाकडून कोरोना नियमांना शिथिल करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाने ठरवून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावे असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.