ऑक्सिजनचा पाईप पंख्याला बांधून कोरोना बाधिताची रुग्णालयातच आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान स्वच्छता गृहाचे दार बऱ्याच वेळापासून बंद असल्याचे सफाई कामगाराच्या लक्षात आले. आतमधून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दार तोडण्यात आले.

    नागपूर. उपराजधानीत एका ८१ वर्षीय कोरोनाबाधिताने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात काल सोमवारी संध्याकाळी आत्महत्या केली ( covid patient suicided). आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव पुरुषोत्तम अप्पाजी गजभिये आहे.  मेडिकलच्या कोरोना वॉर्डात उपचार घेत असलेले गजभिये तेथील प्रसाधन गृहात गेले. तिथल्या एझोस्ट फॅनला ऑक्सिजन पाईप बांधून गळफास घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान स्वच्छता गृहाचे दार बऱ्याच वेळापासून बंद असल्याचे सफाई कामगाराच्या लक्षात आले. आतमधून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दार तोडण्यात आले. गजभिये यांनी प्रसाधन गृहातल्या एझोस्ट फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

    गजभिये शहरातल्या रामबाग परिसरातील रहिवासी आहे. कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना  २६ मार्च रोजी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आत्मत्याचे कारण अद्याप स्पस्ट झालेले नसून अजनी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.