नागपुरातील मनपा केन्द्रांमध्ये शुक्रवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

राज्य शासनाकडून () कोव्हीशिल्ड लसी (Covishield vaccine) प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण (vaccination of all citizens) नागपूर महानगरपालिकेसह (Nagpur Municipal Corporation) शासकीय असलेल्या १४५ केन्द्रावर शुक्रवारी १६ जुलै रोजी होणार आहे.

    नागपूर (Nagpur).  राज्य शासनाकडून () कोव्हीशिल्ड लसी (Covishield vaccine) प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण (vaccination of all citizens) नागपूर महानगरपालिकेसह (Nagpur Municipal Corporation) शासकीय असलेल्या १४५ केन्द्रावर शुक्रवारी १६ जुलै रोजी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

    त्यांचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

    १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.

    केन्द्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार ज्या नागरिकांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे त्यांना दुसरा डोज दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांना सुद्धा दुसरा डोज दिला जाणार आहे. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल.