अल्पवयीन बहिणींचं गुन्हेगारांसोबत लफडं; अपहरण करून दोघींसोबत……

अजय हा कुख्यात घरफोड्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा नागेश याच्याकडे भाड्याने राहातो. दोघांनी १६ व १४ वर्षीय बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

    नागपूर (Nagpur) : जयताळा परिसरात (Jayatala area) राहणाऱ्या सख्ख्या बहिणींचे अपहरण करणाऱ्या (Jayatala area) दोन अपहरणकर्त्यांना प्रतापनगर पोलिसांनी (Pratapnagar police) सिवनीत (Shivni ) सापळा रचून अटक केली. पोलिसांनी दोघींची सुटका केली.

    अजय रामसिंग वरखडे (वय २८) (Ajay Ramsingh Varkhade) आणि नागेश ऊर्फ नाग्या खुशाल उमप (Nagya Khushal Ump) (वय २०, दोन्ही रा. जयताळा झोपडपट्टी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अजय हा कुख्यात घरफोड्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा नागेश याच्याकडे भाड्याने राहातो. दोघांनी १६ व १४ वर्षीय बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

    १२ सप्टेंबरला दोघींचे अपहरण केले. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर ठोसरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलींचा शोध सुरू केला.

    अजय व नागेश हे दोघेही बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळले. अजय हा सिवनीतील बरगड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक बरगड येथे गेले. दोघांना अटक करून दोन बहिणींची सुटका केली. त्यांना नागपुरात आणले. मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची शक्यता असून, पोलिस दोघींची वैद्यकीय तपासणी करणार आहेत.