महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये महिलेची प्रसूती; गोंडस बाळाला दिला जन्म

नागपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी या महिलेस प्रसुती वेदना सुरु झाल्याने टीटीईने उपस्टेशन व्यवस्थापकांना याबाबत माहिती दिली. उपस्टेशन व्यवस्थापक डी. के. सिंग यांनी रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांना बोलाविले.

    नागपूर,  महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असलेल्या एका महिला प्रवाशास प्रसुती वेदना झाल्यानंतर एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रवासादरम्यान प्रसुती वेदन होत असल्याने तिला नागपूर रेल्वेस्थानकावर उतरवून मेयो रुग्णालयात दाखल केले असता मेयो रुग्णालयात महिलेने बाळाला जन्म दिला. मधु रावत ही महिला शनिवारी पती राम सुंदर रावत यांच्या सोबत रेल्वेगाडी क्रमांक 01045 कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेसने प्रवास करीत होती.

    नागपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी या महिलेस प्रसुती वेदना सुरु झाल्याने टीटीईने उपस्टेशन व्यवस्थापकांना याबाबत माहिती दिली. उपस्टेशन व्यवस्थापक डी. के. सिंग यांनी रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांना बोलाविले. प्लॅटफार्म क्रमांक 1 वर स्ट्रेचरवरून महिलेस खाली उतरविण्यात आल्यानंतर डॉ. ऋषिकेश यांनी महिलेची तपासणी केली. रेल्वेच्या रुग्णवाहिकेतून या महिलेस मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळाने महिलेने एका बाळाला जन्म दिला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखविल्यामुळे दोघेही सुखरूप आहेत.