अयोध्येचा लढा लढणारे आम्ही, शिवसेना आणि संजय राऊत यांचे काही योगदान आहे का ? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

अयोध्येचा(Ayodhya) लढा लढणारे आम्ही आहोत. पण योध्येत पभू श्रीरामाचे मंदिर(Ram Mandir) बनत आहे, त्यामुळे काहींच्या पोटात दुखत आहे. अशा शब्दांमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यानी शिवसेनेला उत्तर दिले आहे.

    नागपूर : अयोध्येच्या(Ayodhya) संदर्भात शिवसेना(Shivsena) आणि संजय राऊत(Sanjay Raut) यांचे काही योगदान आहे का? अयोध्येचा लढा लढणारे आम्ही आहोत. पण योध्येत पभू श्रीरामाचे मंदिर बनत आहे, त्यामुळे काहींच्या पोटात दुखत आहे. अशा शब्दांमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यानी शिवसेनेला उत्तर दिले आहे.

    न्यायालयाने सोपवलेल्या जबाबदारीनुसारच केंद्रीय तपास यंत्रणा काम करत असल्याने यात राजकीय काही बोलण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसने सुपारी दिली आहे
    भाजपकडून सूड भावनेने देशमुखांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप खा संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस  म्हणाले की अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सुरु आहे. अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई ही सत्ताप्रेरित आहे. सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की संजय राऊत यांना एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने सुपारी दिली आहे आणि ती सुपारी वाजवण्याचे काम ते करत आहेत.

    लढा देत लोकशाही पुन्हा प्रस्थापित केली.
    दुसरीकडे देशमुखांवरील कारवाईवरुन सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही फडणवीस यांनी उत्तर दिले. ‘सुप्रिया ताईंनी आणीबाणी पाहिली नाही, भोगली नाही, पण आम्ही ती भोगलीय. २१ महिने माझे वडिल तुरुंगात होते. जॉर्ज फर्नांडिससारख्या लोकांना बर्फावर झोपवण्यात आले. ज्यावेळी लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम सुरु होत. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, समाजवादी पार्टी, कम्युनिस्टांनी लढा देत लोकशाही पुन्हा प्रस्थापित केली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चाललेल्या कारवाईला आणीबाणी म्हणणे चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले.