Doctor himself sold seven lakh newborn baby, a big scam in the name of surrogacy in Nagpur

हैदराबाद येथील एका दाम्पत्याला मुलंबाळ होत नव्हते. त्यामुळे ते  सरोगसीच्या माध्यमातून बाळाचा विचार करीत होते. जेव्हा ते  डॉ. भोयर यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून बाळ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

    नागपूर : नागपुरात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. तर, नवजात बाळाची विक्री करणारे रॅकेट (Baby racket) गुन्हे शाखा पोलिसांनी (crime branch police)उघडकीस आणले असल्याने सगळेच थक्क झाले आहे. विशेष बाबा म्हणजे या रॅकेटमध्ये प्रसिद्ध  डॉक्टरांचा हात आहे. तर, पोलिसांनी डॉक्टरसह दोन दलालांना अटक केली. तर, यात काही परिचारिका, महिला डॉक्टर, पॅथोलॉजिस्ट, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, महिला व पुरुष दलालांची मोठी साखळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

    तर, या रॅकेटमध्ये तेलंगणा राज्यातील एका प्राध्यापक दाम्पत्याला ७ लाख रुपयांमध्ये नवजात बाळ विकल्या गेले आहे. डॉ. विलास भोयर (dr. Vilas Bhoyar), राहुल ऊर्फ मोरेश्वर दाजीबा निमजे आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत (शांतीनगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या  आरोपींची नावे आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी येथे ‘क्युअर इट’ नावाने एक रुग्णालय आहे.
    काय आहे प्रकरण ? 
    या बाळाचा जन्म अनैतिक संबंधातून झालेला आहे. दरम्यान, डॉ. भोयरच्या संपर्कात एक गर्भवती महिला आली. काही अनैतिक संबंधातून तिला बाळ होणार होते. त्यामुळे ती गर्भपात करण्याच्या विचारात होती. तर, डॉक्टरांनी तिला थांबवून पैशाचे आमिष दिले. तर, तिला प्रसुतीनंतर पैसे देण्याचे आमिष दिल्याने ती महिला त्या अमिषाला बळी पडली. कामठी येथील गुमथळा येथे डॉ. विलास भोयर हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. तर, राहुल निमजे हा  दलाल त्यांच्याकडे काम करतो. कदाचित  हे दोघेही अनाथ बाळांची खरेदी-विक्री करत असल्याचा संशय पोलिसांने आहे. 
    हैदराबाद येथील एका दाम्पत्याला मुलंबाळ होत नव्हते. त्यामुळे ते  सरोगसीच्या माध्यमातून बाळाचा विचार करीत होते. जेव्हा ते  डॉ. भोयर यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून बाळ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गर्भवती महिला राऊतच्या ओळखीची आहे. २८ जानेवारीला या महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर या नवजात बाळाची सात लाख रुपयांत हैदराबादच्या दाम्पत्याला विक्री करण्यात आली. तर, तक्रारीच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांना ही माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी तपास केला. तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला.