प्रदेश महासचिवांची हकालपट्टी करा; नागपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत गटबाजी उफाळली

नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मंत्री सुनील केदार यांची बदनामी केल्याचा दावा करत आशिष देशमुखांच्या हकालपट्टीची मागणी’ करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणूकीबाबत झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला आहे.

  नागपूर (Nagpur): राज्याच्या उपराजधानी नागपूरमधील जिल्हा काँग्रेसमधील (Nagpur Congress) गटबाजी उफाळून आल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेते पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार (Dairy Development Minister Sunil Kedar) यांच्या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला आहे.

  तर, निलंबित गज्जू यादव यांना सोब घेऊन फिरणाऱ्या पालकमंत्र्याविरोधात (the Guardian Minister) देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळं नागपूर काँग्रेसमधील वाद काही थांबण्याचं चिन्ह नसल्याचं समोर आलं आहे.

  आशिष देशमुख यांची हकालपट्टी करा
  दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांच्यावर आरोप करणाऱ्या ‘प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा’, असा ठराव नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला आहे. ‘मंत्री सुनील केदार यांची बदनामी केल्याचा दावा करत आशिष देशमुखांच्या हकालपट्टीची मागणी’ करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणूकीबाबत झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला आहे.

  नितीन राऊत यांच्यावर नाराजी
  नागपूरचे पालकमंत्री काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्यावरही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निलंबित गज्जू यादव यांना सोबत घेऊन फिरणाऱ्या पालकमंत्र्यांवरंही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

  बेईमानी करणाऱ्या नेत्याला गाडीतून ओढून लावा
  जिल्हा परिषदेच्या पोटनिवुडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सुनिल केदार उपस्थित होते. नागपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत मंत्री सुनील केदार यांनी पक्षाशी बेईमानी करणाऱ्या नेत्याला गाडीतून ओढून लावा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.