माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत; दमदार नेता मिळाल्याने पक्षाची ताकद वाढली

रामटेकचे माजी खासदार (Former Ramtek MP), माजी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री सुबोध मोहिते (former Union Heavy Industries Minister Subodh Mohite) यांनी शुक्रवारी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (the Nationalist Congress Party) प्रवेश केला.

    नागपूर (Nagpur).  रामटेकचे माजी खासदार (Former Ramtek MP), माजी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री सुबोध मोहिते (former Union Heavy Industries Minister Subodh Mohite) यांनी शुक्रवारी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (the Nationalist Congress Party) प्रवेश केला.

    पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (state home minister Dilip Walse Patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मोहिते यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली. मोहिते यांच्या रूपात नागपूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीला अनिल देशमुख यांच्यानंतर बडा नेता मिळाला आहे.

    शिवसेना, काँग्रेस, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा मोहिते यांचा पक्षांतराचा प्रवास आहे. पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेनेपासून त्यांच्यासोबत असलेले राजेश कडू यांच्यासह प्रदीप कांबळे, राजेश मालपे, प्रदीप ठाकरे, खुशाल तांबडे, पवन तिजारे, दशरथ ठाकरे, एकनाथ डहाके, संजय धोंगडे, रोशन तेलंगे व प्रशांत डाखोळे उपस्थित होते.