प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना संकटाच्या काळात आरोग्य भागाकडून खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे. संकटाच्या या घडीतहीह काही स्वार्थी घटक कोरोना रुग्णांची आर्थिक पिळवणूक, फसवणूक करीत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यावर अंकूश लावण्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाने विशेेष वेबसाइट सुरू केली आहे.

    नागपूर (Nagpur). कोरोना संकटाच्या (Corona Crisis) काळात जिल्हा प्रशासनाकडून (district administration) खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा (Oxygen and medicine are being supplied) केला जात आहे. संकटाच्या या घडीतही काही स्वार्थी घटक कोरोना रुग्णांची आर्थिक पिळवणूक, फसवणूक (financial extortion and fraud) करीत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यावर अंकूश लावण्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाने विशेेष वेबसाइट सुरू केली आहे. यावर औषधांसह आॅक्सिजन सिलेंडरचा पुरवठा आणि त्याचा वापर कसा करावा याची पूर्ण माहिती अपलोड करण्यात आली आहे.

    जिल्हा प्रशासनाकडून https://nagpurcovid.in/#/ हे संकेतस्थळ नव्याने सुरू करण्यात आले आहे. यात रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन सिलिंडर जम्बो, ऑक्सिजन सिलिंडर स्मॉल, ऑक्सिजन लिटर, टोसिलीझुमॅब इंजेक्शन, अॅम्फोटेरिसीन बी, सिपोसोमाल अॅम्फोटेरिसीन बी यांसारख्या औषधांचा मिळालेला साठा, हॉस्पिटलला वितरित आणि त्यांनी वापरलेला साठा, यापूर्वी वितरित झालेला साठा अशी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.


    गरजेनुसार इतर सुविधाही यावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक उमेश घुगूसकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे आदी वरिष्ठ अधिकारी या यंत्रणेचा वेळोवेळी आढावा घेतील. हे संकेतस्थळ अपडेट करण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

    वैद्यकीय बेडचे अपडेट एका क्लिकवर (Medical bed updates with one click)
    शहरातील रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय बेडची माहिती महापालिकेकडून नियमित प्रसिद्ध करण्यात येत होती. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णालयांत किती बेड रिक्त आहेत, याची माहिती नागरिकांना सहज मिळत नव्हती. या पार्श्वभूमीवर आता शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालयात रिक्त असलेल्या वैद्यकीय बेडची माहितीही आता या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. खालच्या बाजूला ‘फॉर नागपूर बेड स्टेटस’ अशी लिंक देण्यात आली आहे. यावर गेल्यास रिक्त बेडची माहिती उपलब्ध आहे. हॉस्पिटलनुसारही रिक्त बेडची माहिती येथे पाहता येईल. कोव्हिड हॉस्पिटल आणि तपासणी केंद्रांची माहितीही यावर देण्यात आली आहे.