ईडी, सीबीआयनंतर अनिल देशमुखांच्या मागे आयकर विभागाचा ससेमिरा, सलग दुसऱ्या दिवशी नागपूरमधील घर आणि कार्यालयात धाडसत्र सुरु

अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्या नागपूर येथील निवासस्थानी तसेच त्यांच्या इतरही मालमत्तांवर आयकर विभागाने शुक्रवारी धाड(Income Tax Department Raid) टाकली. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून १६ तास झडती करण्यात आली. गेल्या काही दिवसांत अनिल देशमुख यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले असल्याने आयकर विभाग चौकशी करत आहे.

    नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासह इतर मालमत्तांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल धाड (Income Tax raid) टाकली. आज पुन्हा दुसऱ्या दिवशी आयकर विभागाचे हे धाडसत्र (Income Tax Raid At Anil Deshmukh`s  Property In Nagpur) सुरु आहे. नागपुरातील(Nagpur) मिडास बिल्डिंगमधील साई शिक्षण संस्थेच्या (Sai Educational Institute) कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे. या कारवाई दरम्यान इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकारी आणि सीआरपीएफचे जवानही उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.

    अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी तसेच त्यांच्या इतरही मालमत्तांवर आयकर विभागाने शुक्रवारी धाड टाकली. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून १६ तास झडती करण्यात आली. गेल्या काही दिवसांत अनिल देशमुख यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले असल्याने आयकर विभाग चौकशी करत आहे.

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे आयकर विभागाचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरातून निघाले. यावेळी अनिल देशमुख यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स आपल्यासोबत नेल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्या घरी शुक्रवारी ज्यावेळी आयकर विभागाने धाड टाकली त्यावेळी त्यांच्या घरी अनिल देशमुख आणि त्यांची दोन्ही मुलं उपस्थित नव्हते. तर अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि सून घरी होत्या.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला. काही दिवसांपूर्वी मननी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे सुद्धा टाकले होते.