मृत गाय-बैलांची कातडी बाळगणे गुन्हा नाही; मुंबई उच्च न्यायालय 

महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गाय-बैलांची कत्तल, आयात निर्यात व मालकी करण्यास मनाई आहे. मात्र मृत गायी किंवा बैल यांची कातडी बाळगणे हा गुन्हा नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नागपूर. १४ डिसेंबर रोजी शफिकउल्लाह खान या गाडी चालकाने यासंदर्भातली याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना मृत गायींचे आणि बैलांचे मांस बाळगणे गुन्हा नाही असा निर्वाळा आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गाय-बैलांची कत्तल, आयात निर्यात व मालकी करण्यास मनाई आहे. मात्र मृत गायी किंवा बैल यांची कातडी बाळगणे हा गुन्हा नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जस्टिस व्हि. एम. देशपांडे आणि अनिल किशोर यांच्या खंडपीठाने या संदर्भातला निर्णय दिला आहे.