किरीट सोमय्यांना कोल्हापूर जिल्हाबंदी नोटीस ही लोकशाहीची क्रूर थट्टा : धर्मपाल मेश्राम

एरवी संविधान बचावासाठी उर बडवणा-या आणि संविधानाचे दाखले देणा-या पुरोगामी म्हणविणा -या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्यांचा भ्रष्टाचार बाहेर निधून त्याची लक्तरे वेशीवर टांगली जावू नये ह्यासाठी ही दडपशाही चालवलेली असून महाराष्ट्रातील सुजाण व जागरूक जनता फार काळ हे सहन करणार नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

    नागपूर – माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा होउ नये याकरिता जिल्हाबंदीची नोटीस देणे ही लोकशाहीची क्रुर थट्टा असून संवैधानिक मुल्ये पायदळी तुडविण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेश सचिव ॲड धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.