लॉंगमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर; अँजियोप्लास्टीद्वारे यशस्वी शस्त्रक्रीया 

शनिवारी प्रकृती अस्वस्थतेमुळे प्रा. कवाडेना रामदासपेठ येथील नामांकित अरनेजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. विविध तपासण्याअंती मिळालेल्या निष्कर्षानंतर त्यांच्यावर अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. जसपाल अरनेजा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची एक विशेष टीम प्रा.कवाडे यांच्या उपचार करीत आहे.

    नागपूर : लॉंगमार्च प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी दिली.

    प्रा.कवाडे यांची प्रकृती स्थिर

    शनिवारी प्रकृती अस्वस्थतेमुळे प्रा. कवाडेना रामदासपेठ येथील नामांकित अरनेजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. विविध तपासण्याअंती मिळालेल्या निष्कर्षानंतर त्यांच्यावर अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. जसपाल अरनेजा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची एक विशेष टीम प्रा.कवाडे यांच्या उपचार करीत आहे. शस्त्रक्रियेनंतर प्रा.कवाडे यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांना ते उत्तम प्रतिसाद देत आहेत. लवकरच ते संघटना कार्यात नव्या ऊर्जेने रूजू होती, अशी माहिती जयदीप कवाडे यांनी दिली आहे.

    ९९ टक्के ब्लॉकेज आढळल्याने तातडीने शस्त्रक्रिया

    रुग्णालयात दाखल केल्यानंतर अँजियोग्राफीमध्ये ९९ टक्के ब्लॉकेज आढळून आल्याने डॉ. जसपाल अरनेजा यांनी  अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया केल्याची माहिती जयदिप कवाडे यांनी दिली. असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच संघटनेचे प्रेम आणि आशिर्वाद सरांच्या पाठिशी असल्याने ते लवकर ठणठणीत बरे होतील, असे जयदीप कवाडे म्हणाले