raj thackeray and eknath shinde

मागील काही दिवसांत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी अनेकदा एकमेकांची भेट घेतली आहे. आता पुन्हा नागपुरात ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं पाहायला मिळणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

    नागपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज त्यांनी विधानभवनात जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोघांची बंद दाराआड चर्चा झाली. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चेलाही उधाण आले आहे. सध्या विधिमंडळ अधिवेशन रोज एका मुद्यावरून गाजते आहे. विशेष म्हणजे आज तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लागला. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे महत्त्व वाढले आहे.

    संबंधित नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण मागील काही दिवसांत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी अनेकदा एकमेकांची भेट घेतली आहे. आता पुन्हा नागपुरात ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं पाहायला मिळणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

    राज ठाकरे यांनी आज नागपुरात केलेल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भारतीय जनता पार्टीसह काँग्रेसला राजकीयदृष्ट्या स्थिर होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. आता मनसेचे पोट्टेही येत्या काळात विरोधकांवर वरवंटा फिरवणार आहेत, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे. येथील भाषणानंतर राज ठाकरे यांनी नागपूर विधानसभेच्या मुख्यमंत्री दालनात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अजित अभ्यंकर आदी नेते उपस्थित होते.