corona

नागपूरमध्ये आतापर्यंत एकूण ६५ पेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नागपूरमधील मेडिकल रुग्णालयात एकूण ३६ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

नागपूर : नागपूरमध्ये कोरोना रूग्णांचा आकडा वाढतच आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील स्थानिक प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु नागपूरमध्ये आतापर्यंत एकूण ६५ पेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नागपूरमधील मेडिकल रुग्णालयात एकूण ३६  डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.   

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील मेयो रुग्णालयातील या आठवड्यात ३१ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधीत सर्व डॉक्टरांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा सर्व डॉक्टर कोरोना वॉर्डात रुग्णसेवा करणार आहेत. दरम्यान, नागपूरमधील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण घटलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.