आज MPSC आणि रेल्वेची परीक्षा; दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यी संभ्रमात

दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. रेल्वे परीक्षेचे केंद्र नागपूर, रायपूर, हैदराबाद या ठिकाणी आहे. मात्र, नागपूर येथे लॉकडाऊन असल्याने येथे परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

    नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. एमपीएससीची परीक्षा घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नेमण्यात ३८ केंद्रावर कोरोना प्रादुर्भाव होऊ नये या अनुषंगाने सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सोयी करण्यात आल्या आहेत.

    दरम्यान, रविवारीच, रेल्वे मंडळाचीदेखील परीक्षा होत आहे. यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. एमपीएससीची परीक्षा द्यायची की रेल्वेची, असा पेच विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

    दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. रेल्वे परीक्षेचे केंद्र नागपूर, रायपूर, हैदराबाद या ठिकाणी आहे. मात्र, नागपूर येथे लॉकडाऊन असल्याने येथे परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

    तर, परीक्षा केंद्रावर वेळीच पोहोचण्यासाठी बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिवस आधीच पोहचावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच कसरत होणार आहे. या दोन्ही परीक्षेपैकी विद्यार्थ्यांना कोणतीही एक परीक्षा देता येणार आहे.