कोंबड्याचा अनोखा वाढदिवस; लाडक्या ”कुच्या”साठी श्रीखंड, काजू कतली आणि काजूची मेजवानी

नागपूर जिल्ह्यातील उमरेड मध्ये राहणाऱ्या कागदेलवार कुटुंबात "कुचा" नावाचा हा कोंबडा सर्वांचा लाडका आहे. २० सप्टेंबर रोजी कागदेलवार कुटुंबियांनी कुचाचा वाढदिवस जोरात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशियल मीडियावर प्रचंड वायरल होतंय.

    नागपूर (Nagpur): माणसाचा किंवा आवडत्या कुत्र्याचा वाढदिवस साजरे करण्याचा (celebrate the birthday) मोह अनेकांना असतो; पण कोंबड्याचा वाढदिवस साजरा करणारे विरळेच. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण नागपुरात एका कुटुंबाने घरातील सदस्याप्रमाणे सांभाळलेल्या कोंबड्याचा चक्क वाढदिवस (celebrated the birthday of cock) साजरा केला. हा वाढदिवसही काही साधासुधा नव्हे, बरं का! या दिवशी कुटुबीयांनी आपल्या लाडक्या ‘कुचा’ला श्रीखंड, काजू कतली, काजू, शेंगदाणे आणि इतर सुक्या मेव्याची खमंग मेजवाणी दिली. कोंबड्याच्या वाढदिवसाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

    नागपूर जिल्ह्यातील उमरेड मध्ये राहणाऱ्या कागदेलवार कुटुंबात “कुचा” नावाचा हा कोंबडा सर्वांचा लाडका आहे. २० सप्टेंबर रोजी कागदेलवार कुटुंबियांनी कुचाचा वाढदिवस जोरात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशियल मीडियावर प्रचंड वायरल होतंय. उमरेडच्या मंगळवारी पेठेत कुचा कागदेलवार कुटुंबियांसोबत राहतो. नुकतंच कागदेलवार कुटुंबात राहताना त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यासाठी कुचाची मालकीण असलेल्या सुरभी कागदेलवार यांनी खास सजावट केली होती. या वेळी कुचाचे औक्षण करून गोडधोड खाऊ घालण्यात आले.

    विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी कुचा कोंबड्याचं पिल्लू असताना रस्त्यावर सापडला होता. कोंबड्या घेवून जाणाऱ्या गाडीतून तो पडला होता आणि जखमी झाला होता. सुरभीनं कुत्रा किंवा मांजर या कोंबड्याच्या पिल्लाला खाईल म्हणून त्या त्याला आपल्या घरी आणून त्याच्यावर उपचार केले होते. तेव्हापासून तो कागदेकर कुटुंबातील सदस्य झाला.

    कोंबड्याचा आयुष्यभर सांभाळ करणार
    20 सप्टेंबरला कुटुंबात त्याला या घरात येऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने त्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कुचासाठी श्रीखंड, काजू कतली, काजू -शेंगदाणे प्लेट मध्ये ठेवण्यात आले होते. शिवाय या कोंबड्याचा मित्र असलेल्या शेजारच्या बुलेट नावाच्या कुत्र्यालाही बोलावले होते. या कोंबड्याचा आयुष्यभर सांभाळ करणार असा कागदेलवार कुटुंबियांचा निर्धार आहे.