उपराजधानीत सलग तिसऱ्या दिवशी कोरोना मृतांचा आकडा ५० पार!

सरकारने होळी साजरी करण्यासाठी निर्बंध लावले असताना देखील नागपूरकर मात्र ऐकता ऐकेनात. काल होळी दहनाच्या दिवशी देखील अनेक ठिकाणी सार्वजनिक होळी दहन झाले.

    नागपूर. आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा ५० पार गेला आहे. आज नागपूर जिल्ह्यात ३,१८८ रुग्णाची भर पडली असून ५५ मृत आहेत. शहरातील ३१, ग्रामीण २० आणि जिल्ह्याबाहेरील ४ मृत्यू नोंदविण्यात आले. शहरात २,२२२, ग्रामीण ९५१ आणि जिल्ह्याबाहेरील ४ असे नवीन कोरोना रुग्ण आढळून आले.

    सरकारने होळी साजरी करण्यासाठी निर्बंध लावले असताना देखील नागपूरकर मात्र ऐकता ऐकेनात. काल होळी दहनाच्या दिवशी देखील अनेक ठिकाणी सार्वजनिक होळी दहन झाले. हे काय कमी होते, म्हणूनच आज नागपूरकरांनी कोरोनाच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता अगदी मनसोक्त रंगात न्हाले. तसेच आज दुकाने १२ वाजेपर्यंतच सुरु असल्याने अनेकांनी मांस विक्रीच्या दुकानातही गर्दी केली होती. एकंदरीत सर्व परिस्थिती बघता नागपूरकर कोरोनाबाबत बेजबाबदार झाल्याचे दिसते आहे. परिस्थिती पाहता नागपूरकरांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.