नागपुरात मंगळवारी आढळले ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; पण कोरोना Active रुग्णसंख्येत वाढ

    नागपूर (Nagpur): नागपूर मनपाच्या (Nagpur Municipal Corporation) सकारात्मक प्रयत्नांमुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमालीची कमी झाली आहे. विभागाकडून प्राप्त अहवालानुसार मंगळवारी केवळ ०७ कोेरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona positive patients) नोंद करण्यात आली. परंतु, शहरातील कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांची (corona active patients) वाढली संख्या आरोग्य विभागासाठी (the health department) चिंतेची बाब ठरत आहे. मंगळवारी शहरात 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

    मंगळवारी ०९ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले. आजही कोरोनामुळे कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. कोरोनाला अटकाव करण्यासाठी मंगळवारी ३४९५ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ३४८४ चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आढळून आला. आरोग्य विभागाकडून मंगळवारी १३ लाख ८० हजार ३९८ नागरिकांना कोरोनाची पहिली लस टोचण्यात आली.

    यासह ६ लाख ६४ हजार ८५८ नागरिकांना कोरोनाची दुसरी लस टोचल्या गेली. कोरोना लसीकरणाची मंगळवारची एकूण आकडेवारी २० लाख ४५ हजार २५६ इतकी नोंदविण्यात आली. शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नियमांचे पालन करूनच आपण कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखू शकतो, असे मत ”नवराष्ट्र न्यूज नेटवर्क टीम”कडून जाहीर करण्यात आले आहे.