नागपूरच्या केडीके कॉलेजवळ हा हत्येचा थरार रंगला. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्यात या हत्येची नोंद करण्यात आली आहे. आरोपी आणि मृत तरुणासह तिघा मित्रांनी त्यांच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर पार्टी आयोजित केली होती. यावेळी मित्रांमध्ये वाद झाला. आकाश गोंड असे आरोपीचे नाव असून त्याने मित्र तुषारची हत्या केली आहे.
नागपूर : दारु पार्टी जीवावर बेतल्या धक्कादायक प्रकार नागपुरात घडला आहे. दारुच्या नशेत मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. पार्टीत लावलेल्या गाण्यावरुन वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला.
नागपूरच्या केडीके कॉलेजवळ हा हत्येचा थरार रंगला. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्यात या हत्येची नोंद करण्यात आली आहे. आरोपी आणि मृत तरुणासह तिघा मित्रांनी त्यांच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर पार्टी आयोजित केली होती. यावेळी मित्रांमध्ये वाद झाला. आकाश गोंड असे आरोपीचे नाव असून त्याने मित्र तुषारची हत्या केली आहे.
पार्टी मध्ये त्यांनी एक गाण लावलं होत. या गाण्याचा गायक कोण यावरुन या मित्रांमध्ये चांगलात वाद झाला. हा थेट हाणामारीवर आला. यानंतर रागाच्या भरात आकाश याने तुषारवर चाकूने वार केले. यात तुषार गंभीर झाला. यानंतर आकाशनेच त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात जाण्यापुर्वीच तुषारचा मृत्यू झाला.
यावेळी आकाश आणि त्याच्या सोबत असलेल्या मित्राने तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी काही वेळातच या दोघांना अटक केली. या घटनेमुळे नागपूर शहरात खबळबळ उडाली आहे.