नागपूर विद्यापीठाने परीक्षा शुल्क केले माफ; इतर शुल्कांमध्येही कपात

कोरोना (corona)आणि लॉकडाउनमुळे (lockdown) जनतेवर आर्थिक संकट (Economic crisis) कोसळले आहे. याची दखल घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (RTMNU) विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ (exam fees) करण्याचा निर्णय घेतला आहे.

  नागपूर (Nagpur). कोरोना (corona)आणि लॉकडाउनमुळे (lockdown) जनतेवर आर्थिक संकट (Economic crisis) कोसळले आहे. याची दखल घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (RTMNU) विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ (exam fees) करण्याचा निर्णय घेतला आहे.

  उन्हाळी २०२१ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आधीच अर्ज भरले आहे. हिवाळी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय महाविद्यालयांमार्फत घेण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमध्ये कपात करण्याचेही व्यवस्थापन मंडळाने ठरवले आहे. या संदर्भात लवकरच एक आदेश जारी करण्यात येणार आहे. विद्यापीठ व्यवस्थापन मंडलाचे सदस्य डॉ. मिलिंद बाराहाते यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

  डॉ. नितीन कोंगरे, विष्णू चांगदे यांचा समितीत समावेश आहे. ही समिती कॉलेजकडून आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्कांबाबत सर्वांची चर्चा करणार आहे. शिष्यवृत्ती घेणारे विद्यार्थी, गरीब विद्यार्थ्यांच्या फी माफी संदर्भात एक धोरण समिती ठरवण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. येत्या दहा ते बारा दिवसात समिती आपला अहवाल विद्यापीठाला सादर करणार आहे.

  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संघटनांकडून परीक्षा व इतर शुल्क माफ करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. याकरिता आंदोलनेही करण्यात आली आहेत. लॉकडाउनमुळे वर्षभरापासून कॉलेज आणि अध्यापन बंद आहे. त्यामुळे जिम, लायब्ररी, संगणक, प्रॅक्टिकलसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काची वसुली बंद करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू यांच्याकडे केली होती.

  वेतन रोखल्याची शहानिशा होणार
  लॉकडाउनचा हवाला देऊन अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही. एका महाविद्यालयाने तेरा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार दिला नसल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या होत्या. याची पडताळणी करण्यासाठी व्यवस्थापन मंडळाने एक विशेष समिती स्थापन केली आहे.