नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर, बाजी मारण्यासाठी महाविकास आघाडीचा कस लागणार

नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका (Nagpur Zilla Parishad Bypoll) जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडीचा कस लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी तर 31 पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान होणार आहे. 19 जुलैला ही पोटनिवडणूक पार पडणार आहे.

  नागपूर (Nagpur). नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका (Nagpur Zilla Parishad Bypoll) जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडीचा कस लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी तर 31 पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान होणार आहे. 19 जुलैला ही पोटनिवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लावण्यात आली आहे (Nagpur Zilla Parishad Bypoll Elections Announced Mahavikas Aghadi Has To Work Hard To Save Prestige).

  राज्य निवडणूक आयोगाने (The State Election Commission) नागपूरसह अकोला, वाशीम, नंदूरबार आणि धुळे या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहिर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 अशा एकूण 47 जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.

  ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर ही निवडणूक होत आहे, त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला चांगलाच कस लागणार आहे. डिसेंबर 2019 च्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवरुन निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समित्यांच्या 31 सदस्यांचं सदस्यत्व निवडणूक आयोगाने रद्द केलं होतं.

  त्यारिक्त जागांसाठी 19 जुलै रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने आता खुल्या प्रवर्गातून निवडून येण्यासाठी ओबीसी उमेदवारांना चांगलाच कस लागणार आहे.

  कुठल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोटनिवडणूक होणार?
  नरखेड सावरगाव, भिष्णूर
  काटोल येनवा, पारडसिंगा
  सावनेर वाकोडी, केळवद
  पारशिवनी करंभाड
  रामटेक बोथिया
  मौदा अरोली
  कामठी गुमथळा, वडोदा
  नागपूर गोधनी रेल्वे
  हिंगणा निलडोह,
  डिगडोह इसासनी
  कुही राजोला

  जिल्हा परिषद पोटनिवडणूक (ZP By Election)
  २२ जुलैपासून आचारसंहिता लागू
  राज्य शासनाने कोविड- 19 संदर्भात ऑक्सिजन बेडच्या रुग्णांची संख्या आणि करोना पॉझिटिव्हिटी दरावर आधारित 1 ते 5 स्तर केले आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या पाच जिल्ह्यांचा स्तर- 1 मध्ये समावेश झाला आहे. पालघर जिल्ह्याचा अद्यापही स्तर-3 मध्ये समावेश आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांतील रिक्त पदांच्या निवडणुका वगळता अन्य 5 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांमध्ये 22 जुलैपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

  कसा आहे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम?
  —  29 जून 2021 ते 5 जुलै 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील
  —  4 जुलै 2021 रोजी रविवार असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत
  —    नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 जुलै 2021 रोजी होईल
  —  नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे 9 जुलै 2021 पर्यंत अपील दाखल करता येईल
  — अपील नसलेल्या ठिकाणी 12 जुलै 2021; तर अपील असलेल्या ठिकाणी 14 जुलै 2021 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील
  — 19 जुलै 2021 रोजी सकाळी 07.30 ते सायंकाळी 05.30 या वेळेत मतदान होईल
  — 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल.