Oh my god More than two thousand corona patients in Nagpur

नागपूर जिल्ह्यात मागच्या दहा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी जिल्ह्यात १३ हजार ६९३ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी, २०८६ चाचण्या सक्रिय आढळून आल्या आहेत.  

    नागपूर : जिल्ह्यात कोरोना आपली पकड अधिकच मजबूत करतांना दिसता आहे. आपण सर्वजण लढत असलेले कोरोना विरुद्धचे युद्ध मधल्या काळात संपल्यासारखे वाटत होते. परंतु, कोरोनाने आता चांगलेच डोके वर काढले आहे. गेल्या चोवीस तासांत नागपूरातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पलीकडे गेली आहे. तर, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सात हजारांच्या पलीकडे गेली आहे. तसेच, एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झालेला आहे.

     

    नागपूर जिल्ह्यात मागच्या दहा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तीन जानेवारी ते तेरा जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात ९८ हजार १९४ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ८,५७३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. याची सरासरी ८. ७३ % आहे. म्हणजे दिवसाला सरासरी ८५७ बाधिता रुग्णांची नव्याने नोंद होत आहे. तर, याच कालावधीत जवळपास १८०० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

    तसेच, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५.०२ लाख ९०५ वर पोहचली आहे. तर, कोरोनावर मात करून आज ग्रामीणमधून ३९, शहरातून ३७६ व जिल्ह्याबाहेरील ५५ असे एकूण ४७० बाधित रुग्ण आपल्या घरी परतले आहे. तसेच, नागपुरातील मेडिकलमध्ये एका व्यक्तीचा इतर कारणाने मृत्यू झाला आहे. परंतु , मृत्यूनंतर घेण्यात आलेल्या कोरोनाच्या चाचणीत त्याचा निकाल सकारात्मक आढळून आला आहे. ही वृद्ध व्यक्ती ७० वर्षीय असून कोरोनामुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. तसेच, यापूर्वीही मेडिकलमध्ये मृत्यू पावलेल्या चार रुग्णांनाही कोरोना असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.