Tomato price in Nagpur is 100 Rs. kg

विदर्भ सह संपुर्ण महाराष्ट्रात टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. हे भाव वाढण्याचे मुख्य कारण आहे की माघे महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळे भाजीच्या ठोक मार्केटमध्ये टोमॅटोचे भाव प्रति किलो 65 ते 70 रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली आहे(Tomato price in Nagpur is 100 Rs. kg).

    नागपूर : विदर्भ सह संपुर्ण महाराष्ट्रात टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. हे भाव वाढण्याचे मुख्य कारण आहे की माघे महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळे भाजीच्या ठोक मार्केटमध्ये टोमॅटोचे भाव प्रति किलो 65 ते 70 रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली आहे(Tomato price in Nagpur is 100 Rs. kg).

    भाजीपाल्याचे भाव वाढल्या मुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून खायचे काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. त्यातच आता टोमॅटोचा भाव 100 रुपये किलो इतका झाला आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीला बसला आहे. विशेषत: टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

    एकीकडे पेट्रोल डिझेल ने पहिलेच सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता भाजीपालाही सर्व सामान्य जनतेला रडवत आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचा आवक घटली आहे.