big decision about schools in mumbai it will be closed till 15 january nrvb

"नागपूरमध्ये कोरोनाची तिसरी लाट पोहोचली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे अशी मी नागरिकांना विनंती करतो. नागपूर कोरोना रुग्णसंख्येत पाचव्या क्रमांकावर आहे. नागपूरमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषध याबाबतीत प्रशासन सज्ज आहे. अजून डेल्टा संपलेला नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागपुरात इयत्ता १ली ते ८वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे", असं नितीन राऊत यांनी सांगितली.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नागपूरकरांनी किती यातना सोसल्या आहेत, याची कल्पना देखील करता येणार नाही. हे संकट काही दिवसांपासून ओसरत असल्याचं वाटत असताना आता पुन्हा उभं ठाकलं आहे. नागपुरात तर कोरोनाने गुणाकारच सुरु केल्याचं दृश्य आहे. कारण नागपुरात कोरोनाबाधितांचा आजचा आकडा थेट ४०४ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे काल हाच आकडा १९६ इतका होता. एकाच दिवसात तब्बल दुप्पट रुग्णवाढ झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाची देखील धाकधूक वाढली आहे.

    ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग वाढवणे, चाचण्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी प्रसंगी दंडात्मक कारवाई करा. असे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

    “नागपूरमध्ये कोरोनाची तिसरी लाट पोहोचली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे अशी मी नागरिकांना विनंती करतो. नागपूर कोरोना रुग्णसंख्येत पाचव्या क्रमांकावर आहे. नागपूरमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषध याबाबतीत प्रशासन सज्ज आहे. अजून डेल्टा संपलेला नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागपुरात इयत्ता १ली ते ८वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असं नितीन राऊत यांनी सांगितली.

    या बैठकीत पहिली ते आठवी वर्गापर्यंत शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय गुरुवारपासून सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णयही नागपूर प्रशासनाने घेतला आहे. या चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवले जाणार आहे. मॉल्स, मंगल कार्यालय तसेच थिएटर्समध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून उल्लंघन केल्यास कठोर आर्थिक दंड लावले जाणार आहेत.