सुपर फ्लाॅवर मून पाहण्याची संधी २६ मे रोजी; चंद्रोदयाच्या वेळेस ३५ मिनिटांसाठी होणार छायाकल्प ग्रहण

एप्रिल महिन्यात (April) विलोभनीय सुपरमून पाहिल्यानंतर (After seeing the alluring Supermoon) येत्या २६ मे रोजी पुन्हा ‘सुपर फ्लॉवर मून’ (Super Flower Moon) पाहायला मिळणार आहे. २०२१ मधील हा दुसरा ‘सुपरमून’ असून बुद्धपौर्णिमेला तो असल्याने त्याला ‘फ्लॉवर मून ’असे म्हणतात. यावेळी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर सर्वाधिक कमी म्हणजे तीन लाख ५७ हजार ३११ किलोमीटर (the shortest distance between the Moon and the Earth) असेल.

    नागपूर (Nagpur). एप्रिल महिन्यात (April) विलोभनीय सुपरमून पाहिल्यानंतर (After seeing the alluring Supermoon) येत्या २६ मे रोजी पुन्हा ‘सुपर फ्लॉवर मून’ (Super Flower Moon) पाहायला मिळणार आहे. २०२१ मधील हा दुसरा ‘सुपरमून’ असून बुद्धपौर्णिमेला तो असल्याने त्याला ‘फ्लॉवर मून ’असे म्हणतात. यावेळी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर सर्वाधिक कमी म्हणजे तीन लाख ५७ हजार ३११ किलोमीटर (the shortest distance between the Moon and the Earth) असेल. यावेळी चंद्र १५ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल. तसेच २६ मे रोजी दुपारी चंद्रग्रहणाला सुरुवात होत असल्याने भारतातून मात्र चंद्रोदय होताना ३५ मिनिटांसाठी छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे.

    प्रत्येकवर्षी ‘सुपरमून’च्यावेळी चंद्र-पृथ्वीमधील अंतर कमी-अधिक होत असते. हे किमान अंतर तीन लाख ५६ हजार ५०० किलोमीटर तर कमाल अंतर चार लाख सहा हजार ७०० किलोमीटर इतके असते. यावर्षीचे पृथ्वी आणि चंद्रामधील सर्वाधिक कमी अंतर येत्या २६ मे रोजी राहणार आहे. २६ जानेवारी १८४८ ला चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१६ ला चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आला होता. पृथ्वी आणि चंद्रामधील सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ ला असेल तर ६ डिसेंबर २०५२ ला शतकातील सर्वात मोठे ‘सुपरमून’ राहणार आहे.

    २६ मे रोजी असणारी पौर्णिमा ‘सुपर फ्लॉवर मून’ असली तरीही याच दिवशी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आशियातून यादिवशीचे खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतातील अनेक राज्यातून चंद्रोदयावेळी छायाकल्प चंद्रग्रहण दिसत असले तरीही पूर्वेत्तर भारत, आसाम आणि मणिपूर येथून ते खंडग्रास दिसेल. दुपारी २.१८ वाजता ग्रहणाला सुरुवात झाली असेल. आपल्याकडे सायंकाळी ७.२० वाजता ग्रहण सुटेल. त्यामुळे चंद्र रात्रभर तेजस्वी दिसेल.

    महाराष्ट्रातून सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगवताना छायाकल्प ग्रहणातच उगवेल आणि ३५ मिनिटाने ग्रहण सुटेल. म्हणजेच ग्रहण के वळ ३५ मिनिटांसाठीच पाहता येणार आहे. सायंकाळी ७.२० नंतर ग्रहण राहणार नाही. मात्र रात्रभर ‘सुपर फ्लॉवरमून’ पाहता येईल. चंद्र हा आकाराने खूप मोठा आणि तेजस्वी दिसेल.

    दुर्बिणीची गरज नाही!
    सुपर फ्लॉवर मून पाहण्यासाठी दुर्बिणची आवश्यकता नाही, पण दुर्बिणला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहता येईल. यावेळी चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी असल्याने या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक व स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले.