सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या माळ्यावरून पडून रूग्णाचा मृत्यू

तोल गेल्याने दुसऱ्या माळ्यावरून खाली पडून जखमी झालेल्या ६८ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घडली.

    नागपूर (Nagpur).  तोल गेल्याने दुसऱ्या माळ्यावरून खाली पडून जखमी झालेल्या ६८ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घडली.

    पांडुरंग तुळशीराम बागडे (वय ६८, रा. सिरसपेठ) असे मृतकाचे नाव आहे. तुळशीराम यांना मूत्रपिंडाचा आजार असल्याने त्यांना सुपर स्पेशालिटीमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. नियमित तपासणीसाठी ते शनिवारी सकाळी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आले. तोल गेल्याने दुसऱ्या माळ्यावरून ते खाली पडले. गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.