तृतीयपंथी बनून हिंडणाऱ्या विकृताचा घरातील चिमुकल्यांवर बलात्कार; आईनचे आणला गुन्हा चव्हाट्यावर

    नागपूर (Nagpur) : नागपूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विकृत व्यक्तीने स्वत:च्या आठ वर्षीय मुलीवर अत्याचार (rape) केल्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे तर या विकृताने (Distorted) आपल्या भावाच्या सात वर्षीय मुलासोबतही अनैसर्गिक कृत्य (unnatural acts) केले. शुक्रवारी रात्री या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी (Hudkeshwar police) गुन्हा दाखल केल्यानंतर घटनेचा बोभाटा झाला. त्यामुळे समाजमन (society) संतप्त झाले आहे.

    संज्या (Sanjay) हा नराधम ४० वर्षांचा आहे. तो कामचुकार तर आहेच त्याला विविध विकृतीही जडली आहे. तो तृतीयपंथियांचा वेष करून घरून बाहेर पडतो आणि रस्त्यावर पैसे मागतो. दुसरेही सावज शोधतो. घरच्या महिलांसोबतही त्याचे वर्तन विकृतच असल्याने त्याची आणि त्याच्या भावाची पत्नी अशा दोनही महिला संज्याच्या विकृतीला कंटाळून निघून गेल्या. त्यामुळे संज्याची आठ वर्षीय मुलगी, त्याचा भाऊ, भावाचा ७ वर्षीय मुलगा आणि वृद्ध आई असे पाच जण हुडकेश्वरमधील घरात राहतात. संज्याचा भाऊ चौकीदारी तर आई घरगुती काम करते. हे दोघे बाहेर गेल्यानंतर नराधम संज्या स्वत:च्या मुलीवर आणि पुतण्यावर वासना शमवत होता.

    शुक्रवारी दुपारी ३ वाजता अचानक संज्याची वृद्ध आई घरी परतली. तिने दार ढकलून बघताच विवस्त्रावस्थेतील नराधम चिमुकलीवर अत्याचार करताना दिसला. बाजूला सात वर्षीय चिमुकला होता. वृद्धेने आरोपी संज्याला लाथ घालून दूर केले आणि शिवीगाळ करून दोन्ही नातवांना घराबाहेर आणले.

    वृद्धा संतापाच्या भरात शिवीगाळ करताना बघून शेजार्यांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. शेजारच्यांनी वृद्धेला पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वृद्धा दोन्ही चिमुकल्या नातवांना घेऊन हुडकेश्वर ठाण्यात पोहचली. ठाणेदार सार्थक नेहते आणि त्यांच्या सहकार्यांनी हा संतापजनक प्रकार ऐकून लगेच घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली.

    चिमुकली आणि चिमुकल्यांनी पोलिसांना सांगितलेली माहिती धक्कादायक आहे. हा नराधम या दोघांची अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण करायचा. त्यांना मारहाणही करायचा. त्यामुळे हे बिचारे लहानगे गप्प राहायचे. पोलिसांनी त्यांना बोलते केले असता त्यांनी आपल्या बोबड्या भाषेत या नराधमाची विकृती कथन केली. ती ऐकून काही वेळेसाठी शेजाऱ्यांसोबत पोलिसांचाही संताप अनावर झाला.