नागपूर शहरात कोरोनाच्या ३०९५ नवीन रुग्णांची नोंद; ३३ जणांचा मृत्यू

नागपूर उपराजधानी नागपुरात कोरोनाचा कहर आजही पाहायला मिळाला. आज जिल्ह्यात तब्बल ३०९५ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ३३ जणांचा मृत्यू झाला. इतक्या विक्रमी रुग्णाची नोंद झाल्यानंतर आज परत शहरात मोठ्यासंख्येने रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

    नागपूर (Nagpur).  उपराजधानी नागपुरात कोरोनाचा कहर आजही पाहायला मिळाला. आज जिल्ह्यात तब्बल ३०९५ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ३३ जणांचा मृत्यू झाला. इतक्या विक्रमी रुग्णाची नोंद झाल्यानंतर आज परत शहरात मोठ्यासंख्येने रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

    यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण घरीच विलगीकरणात करण्यात आले आहेत. शहरात कडक लॉकडाऊन असतानाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. नागरिकांचा हा बेधडकपणा बाधितांचा आकडा फुगविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.