सारस पक्षाच्या अस्तित्वाला रेती माफियांचा धोका; पक्षांच्या अधिवासात वाळूतस्करांचा अडथळा

राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात (Gondia district) अस्तित्व असलेल्या ‘सारस’ पक्ष्यांच्या (Saras Bird) संवर्धनासमोरील (the conservation) आव्हान वाढले आहे. यावर्षीच्या सारस गणनेत सारस पक्ष्यांनी राज्यातील या एकमेव अधिवासाकडेही पाठ फिरवण्यास सुरुवात केल्याने महाराष्ट्रातून तो पूर्णपणे नामशेष होण्याची भीती आहे.

    नागपूर (Nagpur).  राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात (Gondia district) अस्तित्व असलेल्या ‘सारस’ पक्ष्यांच्या (Saras Bird) संवर्धनासमोरील (the conservation) आव्हान वाढले आहे. यावर्षीच्या सारस गणनेत सारस पक्ष्यांनी राज्यातील या एकमेव अधिवासाकडेही पाठ फिरवण्यास सुरुवात केल्याने महाराष्ट्रातून तो पूर्णपणे नामशेष होण्याची भीती आहे. आतापर्यंत या पक्ष्याला रासायनिक खते, कीटकनाशके , विषबाधा, विद्युत प्रवाह (chemical fertilizers, pesticides, poisoning, electric current) याचा धोका होता. मात्र, आता वाळूतस्करांचा या पक्ष्यांच्या अधिवासातील हस्तक्षेपाची भर पडली आहे.

    माळढोक पक्ष्याचे अस्तित्व नाहीसे होत असताना संपूर्ण यंत्रणा त्याच्या संवर्धनासाठी सरसावली. माळढोकच्या अधिवासाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. त्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अधिसूची एकमध्ये आणून संरक्षण कवच देण्यात आले. वन खात्यासोबतच वैज्ञानिक आणि संबंधित संस्था माळढोकचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. सारसाच्या अस्तित्वासाठी यंत्रणेला एवढेही दूर जाण्याची गरज नाही. वर्षानुवर्षे सारसांचे संरक्षण करणाऱ्या शेतकरी, गावकरी आणि स्वयंसेवकांवर यंत्रणेची शाबासकीची थाप आवश्यक आहे. दरवर्षी होणाऱ्या सारस गणनेत सारस संवर्धनासमोरील आव्हाने वाढत असल्याचे समोर आले आहे. यावर्षी वाळू तस्करांचा त्यांच्या अधिवासातील हस्तक्षेप हे नवे आव्हान आहे.

    गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात नद्या, तलावांचे प्रमाण अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळू काढली जाते. त्यापाठोपाठ गडचिरोली, वर्धा, नागपूर, यवतमाळ येथेही वाळू काढली जाते. मात्र, अवैधरीत्या वाळू काढण्याचा प्रकार गोंदिया व भंडारा जिल्ह्यात अधिक आहे. गेल्या काही वर्षांत वाळूतस्करीचा हा प्रकार वाढला असून त्याचा परिणाम पाणवठ्यालगत अधिवास असणाऱ्या पक्ष्यांवर होत आहे. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदा सारसांची संख्या घटली आहे. यंत्रणा असेच दुर्लक्ष करत राहिली तर येत्या काही वर्षांत तो महाराष्ट्रातही दिसणार नाही, अशी भीती व्यक्त के ली जात आहे. २०२० मध्ये गोंदिया जिल्ह्यातील नऊ आणि बालाघाट जिल्ह्यातील १२ सारसांच्या पिल्लांनी त्यांचा नवीन अधिवास शोधला. गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक कु लराजसिंग व दक्षिण वनविभाग बालाघाटचे मंडळ अधिकारी जी.के . वरकडे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील गोंदिया आणि मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये १३ ते १९ जूनदरम्यान सारस गणना करण्यात आली.

    महाराष्ट्रात गोंदिया हा एकमेव सारसांचा अधिवास शिल्लक आहे. यावर्षीच्या गणनेत सारसांच्या कमी झालेल्या संख्येने काळजीत भर घातली आहे. या पक्ष्याचे अस्तित्व टिकवायचे असेल तर सारसांच्या लँडस्के पमध्ये संवर्धन आराखडा तयार करावा लागेल. यात त्याच्या अधिवास व्यवस्थापनापासून तर इतरही आवश्यक बाबींची पूर्तता करावी लागेल. माळढोकचे अस्तित्व नाहीसे होत असताना या पक्ष्याला वन्यजीव संरक्षण कायद्याचे कवच देऊन अधिसूची एकमध्ये टाकण्यात आले. सारसांच्या बाबतीतही देशात, राज्यात आणि लँडस्के पमध्ये त्यांच्या संख्येवरून त्याचा दर्जा आणि अधिसूची निश्चित करायला हवी.
    — सावन बाहेकर, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया