नागपूरात Sex Racket चा पर्दाफाश, पोलिसांनी आवळल्या दलालाच्या मुसक्या

रवी दशानन चौधरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो अजनी परिसरातील चुनाभट्टी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी याचं अजनी चौकातील भवानी चेंबरमध्ये 'रिडिफाइन द प्रोफेशनल फॅमिली सलून' नावाचं दुकान आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी याठिकाणी फॅमिली सलूनच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत होता. रवी चौधरी सलूनमध्ये येणाऱ्या आंबटशौकीन ग्राहकांना वेश्या पुरवत होता. त्यासाठी आरोपी शहरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला आणि मुलींच्या संपर्कात होता. तो आपल्या सलूनमध्ये या वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींना जागा उपलब्ध करून देत होता.

    नागपूर : बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फॅमिली सलूनच्या नावाखाली चालत असलेल्या वेश्याव्यवसायाचा नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. येथून एका आरोपीला अटक तर 2 मुलींची सुटका करण्यात आली. चुना भाट्टी, अजनी रहिवासी रवी दशानन चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

    भवानी चेंबर रिडिफाईन द प्रोफेशन फॅमिली सलूनमध्ये महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती एसएसबीच्या पीआय कविता इसरकर यांना मिळाली. माहिती मिळताच एका सामान्य वेशात एका पोलीस कर्मचाऱ्याला सलूनमध्ये पाठवण्यात आले. डील फायनल होताच पंटरने पोलिसांच्या टीमकडे बोट दाखवले. काही वेळातच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी 2 मुलींची सुटका केली.

    रवी दशानन चौधरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो अजनी परिसरातील चुनाभट्टी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी याचं अजनी चौकातील भवानी चेंबरमध्ये ‘रिडिफाइन द प्रोफेशनल फॅमिली सलून’ नावाचं दुकान आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी याठिकाणी फॅमिली सलूनच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत होता.

    रवी चौधरी सलूनमध्ये येणाऱ्या आंबटशौकीन ग्राहकांना वेश्या पुरवत होता. त्यासाठी आरोपी शहरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला आणि मुलींच्या संपर्कात होता. तो आपल्या सलूनमध्ये या वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींना जागा उपलब्ध करून देत होता.

    सलून व्यवसाइक रवीला पोलिसांनी मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ठकलल्या प्रकरणी अटक केली असून त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधीक तपास नागपूर पोलीस करत आहेत.