एसटीवरही लॉकडाऊन इफेक्ट, पुन्हा ५० टक्के क्षमतेनेच चालणार?

कोरोना लॉकडाऊननंतर ज्यावेळी एसटी सेवा सुरू झाली, त्यावेळी अर्ध्या क्षमतेसहच सुरू झाली होती. एकूण आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवासीच एसटीनं प्रवास करू शकत होते. त्यानंतर कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावल्यानंतर पूर्ण क्षमतेने एसटी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे एसटी निम्म्या क्षमतेनं चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

    राज्याच्या विविध भागांत सध्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. ज्या भागात कोरोना प्रवासांची संख्या सर्वाधिक आहे, त्या ठिकाणी अंशतः लॉकडाऊन करण्यात आलाय. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये तर सोमवारपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानंदेखील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अर्ध्या क्षमतेनंच गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय.

    कोरोना लॉकडाऊननंतर ज्यावेळी एसटी सेवा सुरू झाली, त्यावेळी अर्ध्या क्षमतेसहच सुरू झाली होती. एकूण आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवासीच एसटीनं प्रवास करू शकत होते. त्यानंतर कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावल्यानंतर पूर्ण क्षमतेने एसटी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे एसटी निम्म्या क्षमतेनं चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

    याबाबत एसटी मुख्यालयाकडून तसे निर्देश अद्याप देण्यात आलेले नाहीत. मात्र जिल्हा प्रशासनाने तसे आदेश दिल्यामुळे सोमवारपासून अर्ध्या क्षमतेनं वाहतूक करण्याची तयारी महामंडळानं सुरू केलीय. शनिवार आणि रविवारी पूर्ण क्षमतेने एसटी सेवा सुरू राहिल, मात्र सोमवारपासून एसटी अर्ध्या आसनक्षमतेसह चालवली जाण्याची शक्यता आहे.

    यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार असला, तरी कोरोनाच्या वाढीला आळा घालण्यासाठी हे निर्बंध गरजेचं असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. केवळ एका पातळीवर लॉकडाऊन करून उपयोग नाही. सर्व पातळ्यांवर त्याची अंमलबजावणी होईल आणि कुठेच गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली, तरच कोरोनावर नियंत्रण शक्य होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.