नागपुरात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ; Active रुग्णसंख्याही वधारली

    नागपूर (Nagpur): जिल्ह्यात बुधवारी कोरोना रुग्णांची संख्या (The number of corona patients) शून्य असल्याचे दर्शविण्यात आले. यामुळे नागपूर शहर कोरोनामुक्त (corona-free) झाल्याचा निःश्वास नागरिकांनी टाकला; परंतु नागपूर महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation’s) आरोग्य विभागाकडून (health department) गुरुवारी हाती आलेल्या ताज्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात (Nagpur district) 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 11, ग्रामीण भागातील 03 आणि जिल्ह्याबाहेरील 01 रुग्णाचा समावेश आहे.

    नागपुरकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे अद्यात जिल्ह्यात कोरोनामुळे कोणत्याही रुग्णाचा मृृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 73 इतकी नोंदविली गेली. यामध्ये नागपूर शहरातील 59 आणि ग्रामीण भागातील 12 रुग्णांचा आणि जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. शहरात कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून गुरुवारी 4657 कोरोना संशयित रुग्णांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली.

    यामध्ये नागपूर शहरातील 3451 आणि ग्रामीण भागातील 1206 रुग्णांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या प्रभावी उपचारांमुळे पूर्वी कोरोना संक्रमित असलेले 12 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी संचारबंदीचे नियम शिथिल केले आहेत. मात्र, दैनंदिन व्यवहारात वावरताना कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे केल्यास आपण कोरोनाची संभावित तिसरी लाट रोखू शकतो, असे आवाहन नवराष्ट्र न्यूज नेटवर्कतर्फे करण्यात आले आहे.