तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या; सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमधील घटना

मेडिकल कॉलेज हॉस्पिटलशी (Medical College Hospital) संलग्नित सुपरस्पेशालीटी रुग्णालयाच्या (superspeciality hospital) तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन ६२ वर्षीय रुग्णाने आत्महत्या केली (committed suicide). ही घटना रविवारी सकाळी घडली.

    नागपूर (Nagpur).   मेडिकल कॉलेज हॉस्पिटलशी (Medical College Hospital) संलग्नित सुपरस्पेशालीटी रुग्णालयाच्या (superspeciality hospital) तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन ६२ वर्षीय रुग्णाने आत्महत्या केली (committed suicide). ही घटना रविवारी सकाळी घडली. दीपक सराफ (वय ६२) (Deepak Saraf) असे मृतकाचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दीपक यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता व कावीळ झाल्याचेही निदान डॉक्टरांनी केले. शनिवारी ते उपचारासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. सोमवारी त्यांच्या स्वादुपिंडातील अशांचे नुमने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार होते.

    रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास दीपक यांचा मुलगा चहा आणायला गेला. दीपक हे वॉर्डातून बाहेर आले. त्यानंतर ते तिसऱ्या माळ्यावरून खाली पडले. या घटनेने कर्मचारी व रुग्णांमध्ये खळबळ उडाली. कर्मचाऱ्याने अजनी पोलिसांना माहिती देत जखमी दीपक यांना तातडीने मेडिकलमध्ये हलविले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दीपक यांनी आत्महत्या केली की तोल जाऊन ते खाली पडले,याचा तपास अजनी पोलिस करीत आहेत.

    १५ मे रोजीही सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावरून पडून ६८ वर्षीय रूग्ण पांडुरंग तुळशीराम बागडे (वय ६८ रा. सिरसपेठ) यांचा मृत्यू झाला होता. यावेळी बागडे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. तुळशीराम यांना मूत्रपिंडाचा आजार होता.