‘विधानसभा अध्यक्ष निवडीचा निर्णय राज्यपालच घेतील’ – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांशी संवाद साधताना विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले की, राज्यपालांचे अधिकार किंवा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक या संदर्भात जो काही निर्णय आहे तो निश्चितपणे राज्यपाल घेतील. पण या संदर्भात आम्ही जे काही बदल केले आहेत ते बदल भारतीय संविधानाच्या आर्टीकलशी सुसंगत वाटत नाहीत. अशा प्रकारे सर्व अधिकार काढून घ्यायचे आणि विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अधिक महत्त्व द्यायचे हे काही योग्य नाही म्हणून आम्ही याचा विरोध केला आहे.

    नागपूर : राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमात बदल केले आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय थेट राज्यपालांच्या कोर्टात दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

    विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात राज्यपालांच्या अधिकारांमध्ये जे बदल करण्यात आले आहेत, ते संविधानातील तरतुदींशी सुसंगत वाटत नाही. अशाप्रकारे राज्यपालांचे अधिकार कमी करणं, त्याऐवजी मंत्रिमंडळाचा सहभाग वाढवणं हे योग्य नाही, त्यामुळे भाजपा त्याचा विरोध करत आहे, असं फडणवीस म्हणाले.

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांशी संवाद साधताना विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले की, राज्यपालांचे अधिकार किंवा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक या संदर्भात जो काही निर्णय आहे तो निश्चितपणे राज्यपाल घेतील. पण या संदर्भात आम्ही जे काही बदल केले आहेत ते बदल भारतीय संविधानाच्या आर्टीकलशी सुसंगत वाटत नाहीत. अशा प्रकारे सर्व अधिकार काढून घ्यायचे आणि विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अधिक महत्त्व द्यायचे हे काही योग्य नाही म्हणून आम्ही याचा विरोध केला आहे.

    दरम्यान, अधिवेशनात काही आमदार करोना पॉझिटीव्ह आढळल्याची चर्चा आहे. त्यावरून सरकार अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे का, असं विचारलं असता पाच दिवसांचं अधिवेशन आहे, त्यातले तीन दिवस गेलेत आणि दोन दिवस उरलेत, त्यामुळे अधिवेशन गुंडाळून किती गुंडाळणार, असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला.