कोरोनाची पहिली लस घेणाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

५५ वर्षाचे पवार यांना मधुमेह होता त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर लसीकरणाचा काय प्रभाव होतो हे पाहण्यासाठी त्यांना ट्रायल मोहिमेत सहभागी केले होते.

    नागपूर. व्यवसायाने मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह असलेले पवार हे व्हॅक्सिनेशनच्या ट्रायलमध्ये सहभागी झाले होते. ५५ वर्षाचे पवार यांना मधुमेह होता त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर लसीकरणाचा काय प्रभाव होतो हे पाहण्यासाठी त्यांना ट्रायल मोहिमेत सहभागी केले होते. पवार याच्या कुटुंबियांच्या मते ते कोव्हीड लस घेणारे नागपुरातले पहिले व्यक्ती होते. मार्च महिन्यात त्यांनी लसीचा दुसरा डोज घेतला. लसीकरण झाल्याने आपल्याला कोरोना होणे शक्य नाही असे त्यांना वाटले आणि त्यांचा हा निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेतला. पवार यांचा होळीच्या दिवशी कोरोनामुळे मृत्यू झाला.

    पवार यांना कोरोनाचे लक्षणे असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. खोकला आणि कफचा त्रास वाढल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली, ती पॉसिटीव्ह आली. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावले गेले परंतु प्रतिकार शक्ती कमी झाल्याने कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. लसीकरण झाल्यानंतरही मास्क घालणे, हात धुणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे.